पिंपरी : विश्वास संपादन करून अत्याचार अन् 17 लाखांना गंडा | पुढारी

पिंपरी : विश्वास संपादन करून अत्याचार अन् 17 लाखांना गंडा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे अमिष दाखवून महिलेसोबत वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून 17 लाख रुपये घेत आरोपी पळून गेला. ही घटना 2017 ते 22 मार्च 2023 या कालावधीत हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. 24) फिर्याद दिली.

त्यानुसार, पोलिसांनी विजयसिंग सुजभानसिंग तंवर (30, रा. उत्तरनगर, मुळगाव – रामनगर डुंगरपूर, राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीने फिर्यादीस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी शारीरिकसंबंध प्रस्तापित केले. तसेच आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून रोख स्वरुपात साडेबारा लाख रुपये तसेच ऑनलाईन स्वरुपात चार लाख 77 हजार 630 रुपये घेतले. तसेच फिर्यादीची फसवणूक करून आरोपी पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Back to top button