पिंपरी : 134 पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई; नळजोड तोडले | पुढारी

पिंपरी : 134 पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई; नळजोड तोडले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वसुली मोहीम तीव्र केली आहे. थकबाकी न भरल्यास नळजोड खंडित केला जात आहे. आतापर्यंत एकूण 134 नळजोडधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षांतील अखेरचा मार्च महिना सुरू असल्याने पाणीपुरवठा विभागाने वसुली मोहीम तीव्र केली आहे. थकबाकीदारांची यादी तयार करून सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयानिहाय पथके तयार करून पोलिस बंदोबस्तात कारवाई केली जात आहे.

पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळजोड तोडले जात आहेत. आतापर्यंत एकूण 134 नळजोडधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. थकबाकीदारांकडून एकूण 65 लाखांची वसुली करण्यात आली आहे. ही कारवाई उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, मीटर निरीक्षक, प्लंबर, मजूर व महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाच्या पथकांनी केली. ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. थकबाकीदारांनी संबधित क्षेत्रीय कार्यालय किंवा पालिकेच्या pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइनने बिलाचा भरणा तात्काळ करावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता रामदास टकले यांनी केली आहे.

Back to top button