मोशी परिसरात अनधिकृत फलकांवर कारवाई | पुढारी

मोशी परिसरात अनधिकृत फलकांवर कारवाई

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. ते फलक जप्त करून गोदामात जमा केले जात आहेत. या प्रकारची कारवाई मोशी परिसरात गुरूवारी (दि.23) करण्यात आली. अनेक संस्था, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार व संघटना महापालिकेची परवानगी न घेता कोठेही व कशाही प्रकारे फ्लेक्स व फलक लावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो.

तसेच, शहर विद्रुप होते. त्यामुळे अशा विनापरवाना फ्लेक्स व फलकावर सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई केली जात आहे. चौक, विजेचे खांब, सीमा भिंत, उड्डाणपुल, बीआरटीचे कठडे, झाडे आदी ठिकाणी लावलेले फ्लेक्स व फलक जप्त करण्यात येत आहेत. मोशी परिसरातील अनेक फ्लेक्स व फलक जप्त करण्यात आले.

Back to top button