जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक शिस्तीसाठी उपाय | पुढारी

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक शिस्तीसाठी उपाय

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जुन्या पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येत असून, वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे नियम तोडणार्‍या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली. जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्या बाबत सदस्य भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

फडणवीस म्हणाले, जुन्या पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अत्याधुनिक आयटी एम्स यंत्रणा बसविण्यात येणार आहे. जेणेकरून लेनची शिस्त न पाळणार्‍यांवर कारवाई करता येईल. मिसिंग लिंकदेखील पूर्ण होणार आहे. तसेच आताही लेनची शिस्त न पाळणार्‍यांवर वाहतूक पोलिसांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. तसेच वाहनांचा दंड वसुली करण्यासाठीही सर्व वाहनचालकांचे अद्ययावत मोबाईल क्रमांकाची माहिती करण्यात येईल, या प्रश्नाच्या अनुषंगाने सदस्य भाई जगताप, अनिकेत तटकरे, महादेव जानकर, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले. फफ

 

Back to top button