पुणे : राजगुरूनगर नगरपरिषदेला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली

पुणे : राजगुरूनगर नगरपरिषदेला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली

कडूस : पुढारी वृत्तसेवा :  चासकमान धरणातुन राजगुरूनगर नगरपरिषदेला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन चासकमान धरणाच्या भिंतीजवळून जाणाऱ्या साकुर्डी रस्त्यावर फुटली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

चासकमान धरणाच्या भिंतीजवळून जाणाऱ्या साकुर्डी रस्त्याच्या मधोमध ही पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा सुमारे सात ते आठ फुटाचा फवारा उडताना दिसून आला. गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी (दि. २४) रात्री ही पाईपलाईन फुटल्याचे नागरिकांनी सांगितले. या योजनेवर देखभाल करण्यासाठी नेमलेले कर्मचारी व नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला.

शुक्रवारी संध्याकाळी पाणीपुरवठा होताच पाण्याचा दाब वाढल्याने अचानक पाईपलाईन फुटून परिसरात फवारे उडण्यास सुरवात झाली. त्यात हजारो लिटर पाणी वाया जात परिसरात पाण्याचे तलाव निर्माण झाले आहे. मोठा फवारा असल्याने रस्ता बंद झाला आहे. कडधे गावचे माजी उपसरपंच कैलास मुन्ना नाईकडे, दिपक तनपुरे यांना हे लक्षात येताच त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news