पुणे: बोपोडीमध्ये उच्च दाबाच्या वीज तारांच्या संर्पकात आल्याने चिमुरडीचा मृत्यु | पुढारी

पुणे: बोपोडीमध्ये उच्च दाबाच्या वीज तारांच्या संर्पकात आल्याने चिमुरडीचा मृत्यु

पुणे, पुढारी वृत्तसेवा: घराच्या छतावर गेलेल्या एका दहा वर्षाच्या मुलीचा उच्च दाबाच्या वीज तारा संर्पकात आल्याने रुग्णालयात उपचार घेताना मृत्यु झाल्याची घटना घडली. या प्रकरणी घरमालकावर पोलीसांनी हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती शुक्रवारी दिली आहे.

शुभ्रा ओहाळ (वय-10) असे मृत मुलीचे नाव अ्राहे. या प्रकरणी महेमुद्दीन मगदुम (रा.बोपोडी, पुणे) यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गणेश अरविंद ओहाळ (वय 35, रा. बोपोडी, पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 15 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बोपोडी परिसरातील पवळे चाळ याठिकाणी घडला आहे.

अरविंद शिंदे हे त्यांच्या कुटुंबासमवेत बोपोडीतील पवळे चाळ याठिकाणी भाडेतत्वावर राहण्यास आहेत. घरमालक महेमुद्दीन मगदुम याने त्याच्या घराच्या खोलीवरुन महावितरणची उच्च दाबाची विजेची केबल गेलेली असताना आणि त्यामुळे मानवी जिवितास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असताना, आर्थिक फायद्यासाठी संबंधित अनाधिकृत रूम बांधली. त्यानंतर संबंधित खोली त्याने भाडयाने रहाण्यास दिली. तक्रारदार गणेश ओहाळ यांची मुलगी छताजवळ गेलेल्या हाय व्होल्टेज विजेच्या केबलमुळे लागलेल्या आगीमध्ये गंभीर जखमी झाली. त्यानंतर सदर मुलीस ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, तिचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस गुंजाळ पुढील तपास करत आहे.

Back to top button