पिंपळे गुरव येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई | पुढारी

पिंपळे गुरव येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई

नवी सांगवी; पुढारी वृत्तसेवा : पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रिय कार्यालयअंतर्गत प्रभाग क्र. 31 व प्रभाग क्र 32 मध्ये अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ही धडक कारवाई करण्यात आली. पिंपळे गुरव येथील आनंद पार्क, देवकर पार्क, शिवराम नगर येथील एकूण 1500 चौरस फूट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

तसेच पत्रशेड असलेले 02 अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून घेण्यात आले. ही कारवाई ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांच्या आदेशानुसार स्थापत्य अभियंता संदीप हजारे, अश्विनी ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून करण्यात आली. या वेळी सांगवी पोलिस, मनपा पोलिस, महाराष्ट्र सुरक्षा बल, जे.सी.बी यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

Back to top button