पिंपरी : उन्हाळ्यात जाणवतोय हिवाळ्यातील गारवा | पुढारी

पिंपरी : उन्हाळ्यात जाणवतोय हिवाळ्यातील गारवा

पिंपरी : मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील वातावरणाला कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात रात्री हिवाळ्यातील गारवा जाणवत आहे. मार्चच्या सुरुवातीला तापमानाचा पारा 35 ते 36 अंशांपर्यंत वाढला होता. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.

त्यामुळे शहरवासीयांना ऐन उन्हाळ्यात चटका बसणार्‍या उन्हापासून दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला होता. तर, काही ठिकाणी तुरळक ते हलक्या स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली होती. सध्या सकाळी व रात्री वातावरणामध्ये गारवा जाणवत आहे. त्यामुळे घरामध्ये जोरात फिरणार्‍या पंख्याचा वेगही काहीसा कमी झाला आहे. बदलेल्या या वातावरणामुळे कडक उन्हाचा मार्च महिना तरी सुसह्य झाल्याच्या भावना नागरिकांमध्ये आहेत.

दिनांक कमाल किमान
17 मार्च 32 18.5
18 मार्च 33.6 20.1
19 मार्च 34 19.4
20 मार्च 31 19.7
21 मार्च 30 18.8
22 मार्च 33 18.7
23 मार्च 33 19.6

Back to top button