पिंपरी : कोरोनाचे 7 बाधित रुग्ण; 4 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू | पुढारी

पिंपरी : कोरोनाचे 7 बाधित रुग्ण; 4 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू

पिंपरी : देशभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळू लागले असताना पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी (दि. 23) दिवसभरात 7 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, महापालिकेच्या आकुर्डीतील रुग्णालयात सध्या 4 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरामध्ये सध्या गृहविलगीकरणात 160 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दररोज सरासरी 7 ते 15 रुग्ण आढळत आहेत.

महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, की महापलिकेच्या आकुर्डी रुग्णालयात सध्या 4 कोरोना सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आजाराची साथ शहरामध्ये नियंत्रणात आहे. काही दिवसांपूर्वी एका दिवशी 50 रुग्ण आढळले होते. रुग्णालयांकडून दोन-तीन दिवसांची संकलित माहिती एकत्र आल्याने हा आकडा वाढला होता. मात्र, सध्या दररोज आढळणार्‍या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे.

Back to top button