पुणे : दौंडमधील रस्त्यांसाठी 50 कोटी ; आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांची माहिती | पुढारी

पुणे : दौंडमधील रस्त्यांसाठी 50 कोटी ; आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांची माहिती

खोर : पुढारी वृत्तसेवा :  दौंड तालुक्यातील प्रमुख 15 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांनी दिली. अर्थसंकल्पात मिळालेल्या या भरघोस निधीमुळे तालुक्यातील रस्त्यांचे जाळे मजबूत होऊन दळणवळण सुरळीत होणार आहे. शेतकरीबांधवांना आपला शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी दर्जेदार रस्ते मिळावेत, या उद्देशाने दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार तालुक्यातील प्रमुख 15 रस्त्यांच्या दुरुस्ती कामासाठी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पातून सुमारे 50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाला आहे, असे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांनी सांगितले.

दौंड तालुक्यातील रस्त्यांसाठी मिळालेल्या निधीची माहिती पुढीलप्रमाणे : 1) टेळेवाडी ते वाळकी ते रांजणगाव सांडस रस्ता- 5 कोटी रुपये, 2) मेमाणवाडी ते पानवली रस्ता- 5 कोटी रुपये, 3) पाटेठाण ते देवकरवाडी व दहिटणे ते खामगाव रस्ता – 4 कोटी 50 लाख रुपये, 4) नवीन गार ते रेल्वे गेट व गिरिम ते कुरकुंभ रस्ता – 4 कोटी 50 लाख रुपये, 5) गार फाटा ते गार रस्ता – 4 कोटी 50 लाख रुपये, 6) तांबेवाडी (खामगाव) ते खुटबाव रस्ता- 4 कोटी रुपये, 7) कासुर्डी ते बोरीऐंदी रस्ता- 3 कोटी रुपये, 8) वाखारी ते केडगाव व दापोडी ते नानगाव रस्ता- 3 कोटी रुपये, 9) हिंगणीगाडा ते मळद रस्ता- 3 कोटी रुपये, 10) राजेगाव ते खानोटा रस्ता- 3 कोटी रुपये, 11) केडगाव टोलनाका ते पिंपळगाव व उंडवडी ते खामगाव रस्ता- 2 कोटी 50 लाख रुपये, 12) हिंगणीबेर्डी ते देऊळगावराजे फाटा रस्ता- 2 कोटी रुपये, 13) धुमाळवस्ती पांढरेवाडी ते कुरकुंभ रस्ता- 2 कोटी रुपये, 14) वाळकी संगम ते वाळकी रस्ता- 2 कोटी रुपये, 15) वडगाव पूल ते वडगाव ते पेडगाव रस्ता- 2 कोटी रुपये.

 

Back to top button