जेजुरी : खंडोबा मंदिरात किरणोत्सव | पुढारी

जेजुरी : खंडोबा मंदिरात किरणोत्सव

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  सूर्याचे उत्तरायण 22 मार्चपासून सुरू झाले आहे. उष्ण कटिबंधीय प्रदेशात सूर्य किरणे सरळ पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच मंदिरातील गाभार्‍यात सूर्याची किरणे मूर्तींना स्पर्श करीत आहेत. गुरुवारी (दि. 23) पहाटेच्या सुमारास महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात सूर्याच्या किरणांनी प्रवेश केला.

मंदिरातील श्री मार्तंड भैरव, तसेच सर्व मूर्तींना या किरणांनी स्पर्श केला. या किरणांनी गाभारा प्रकाशमय झाला. किरणोत्सव मंदिरातील नित्य सेवेकरी, पुजारी सेवक आणि भाविकांनी अनुभवला. या वेळी भाविकांनी येळकोट येळकोट जयमल्हार चा जयघोष करून भंडारा उधळून जल्लोष केला.

Back to top button