

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोंढवा परिसरात असलेल्या टिळेकर नगर मध्ये एका टोळक्याने तलवारी आणि हॉकीस्टीकच्या सहाय्याने तूफान राडा घातला. या टोळक्याने परिसरातील पंधरा ते वीस वाहनांची तोडफोडही केली. यामध्ये सहा चार चाकी, तीन दुचाकी, एक रिक्षा आणि छोटा हत्तीचा समावेश आहे. किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी ऋषिकेश मोरे सुशील दळवी प्रवीण भोसले आणि त्याच्या इतर साथीदारांनी ही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे.
या टोळक्याने घातलेल्या राड्यामुळे आणि वाहनांच्या तोडफोडीमुळे परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत कोंढवा परिसरात घडलेली ही दुसरी घटना आहे. अशा घटना सतत घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमता