पुणे : आरटीओकडून शहरात जोरदार कारवाई | पुढारी

पुणे : आरटीओकडून शहरात जोरदार कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरामधील अपघातांची संख्या लक्षात घेत, आरटीओ अधिकार्‍यांनी शहरात वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहनांवर आता धडक कारवाई सुरू केली आहे. यात हेल्मेट, स्पीड लिमिट, हाय सिक्युरिटी, सेट बेल्ट यांसारखी विशेष कारवाई करण्यात येणार आहे. मागील दोन आठवड्यांपूर्वी आरटीओ अधिकार्‍यांनी केलेल्या अभ्यासात पुण्यातील छोट्या रस्त्यांवर दुचाकींचे अपघात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले होते.

त्यामुळे पुणे शहरातील मध्यवस्तीसह छोट्या रस्त्यांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ अधिकार्‍यांनी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आता शहरातसुद्धा आरटीओकडून कारवाई सुरू झाली आहे. शहरात विविध वाहतूक नियमांचा भंग केला की, वाहतूक पोलिस अगोदरच पुणेकरांवर कारवाई करतात. त्यात आता आरटीओसुध्दा शहरात कारवाई करणार आहेत. त्यामुळे पुणेकरांवर होणार्‍या डबल कारवाईबाबत पुणेकर वाहनचालक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Back to top button