पुणे : राजेगाव दलित वस्तीच्या कामात गोंधळ | पुढारी

पुणे : राजेगाव दलित वस्तीच्या कामात गोंधळ

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा :  राजेगाव (ता. दौंड) येथे दलित वस्तीतील विविध विकासकामे मनमानी पद्धतीने झाली आहेत. त्यामध्ये सिमेंट कँाक्रीट रस्त्याचे काम तीन वस्तीत मंजूर आहे, त्यापैकी दोन वस्तीतील रस्ते पूर्ण झाले आहेत. एक रस्त्याचे काम शिल्लक बाकी आहे. शासकीय नियमानुसार ही कामे झालेली नसून कामे कोणता ठेकेदार करीत आहे, याची मला कसलीही माहिती नाही, असे शाखा अभियंता पंचायत समिती दौंड जे. बी. शिंदे यांनी सांगितले. दलित वस्तीतील तीन रस्ते प्रत्येकी पाच लाख रुपयांचे आहेत. प्रत्यक्षात एवढे काम झालेले नाही. त्यासाठी लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले आहे. या कामाविषय तक्रार येथील ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.

राजेगाव येथील सन 2022 ते 2023 अंतर्गत दलित वस्ती सुधारणा योजना यामधून खरात वस्ती, भोसले वस्ती, संत रोहिदास नगर, आंबेडकर नगर या वस्तीतील रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी पाच लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यापैकी भोसले वस्ती आणि खरात वस्तीतील रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. या कामांचा दर्जा चांगला नसून, काही कामे काही तासांत ठेकदाराने पूर्ण केली आहेत. सदरील कामे शासकीय इस्टिमेटप्रमाणे केली गेलेली नाहीत, कामासाठी लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले आहे. संबंधित कामाची चौकशी करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Back to top button