पुण्यात भरदिवसा लुटीचा थरार ! कोयत्याचा धाक दाखवून लुटले 45 लाख

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात रास्ता पेठेत आझाद आळी मधून टू व्हीलर वरून आलेल्या दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून पैशाची पिशवी पळवली. पिशवीत 45 लाखाची रोकड असल्याचे समजते. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. पुण्यातील व्यावसायिकाकडे काम करणारा एक व्यक्ती बँकेत रोकड भरण्यासाठी दुचाकीवरून निघाला असता, दोघा चोरट्यांनी सुरुवातीला गाडीचा अपघात झाल्याचा बहाणा करून रोकड घेऊन निघालेल्या व्यक्तीला थांबवले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवत संबंधित व्यक्तीकडील पैशांची पिशवी घेऊन पोबारा केला.