पिंपरी : माझं कुठं जळतंय ! | पुढारी

पिंपरी : माझं कुठं जळतंय !

संतोष शिंदे : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात आलेल्या अधिकार्‍यांची शासकीय वाहने परिसरातच पार्क केली जातात. बहुतांश वाहनामध्ये चालक ‘एसी’ लावून बसलेले दिसून येतात. ‘एसी’ सुरू राहण्यासाठी वाहनांचे इंजिन सुरू ठेवले जाते. त्यामुळे अनावश्यक इंधन जळते. परिणामी इंधनावरील अनावश्यक खर्चही वाढतो; मात्र या पार्क केलेल्या वाहनांत बसलेल्या चालकांच्या चेहर्‍यावरचे भाव हे ‘माझं कुठं जळतंय, असेच काहीसे असतात.

हिशेब ठेवण्याची गरज
पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाहनांच्या इंधन खर्चासाठी दरमहा सुमारे वीस लाख इतका खर्च येतो. यामध्ये वाहनांचा दररोज होणारा वापर आणि इंधनावरील खर्च, याचा तंतोतंत हिशेब ठेवण्याची गरज आहे. ज्यामुळे इंधन खर्चावरील भार काही प्रमाणात का होईना कमी होऊ शकतो.

लॉग बुकचे परीक्षण आवश्यक
शासकीय वाहन कोठे आणि किती किलोमीटर फिरवले, याबाबत ठाण्यातील लॉग बुकमध्ये पोलिस चालकांकडून नोंदी केल्या जातात. त्यासाठी एक ते नऊ कॉलम तयार करून देण्यात आले आहेत. प्रभारी अधिकार्‍याने कॉलममध्ये भरलेली माहिती तपासणे आवश्यक आहे. मात्र, प्रभारी अधिकारी लॉगबुकचे परीक्षण न करताच सह्या करतात. त्यामुळे चालकांनी इंधनाचा मेळ घालण्यासाठी केलेल्या बोगस नोंदी समोर येत नाहीत.

देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली डागडुजी
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय एकूण 183 दुचाकी आहेत. यातील नवीन आलेल्या मोजक्याच दुचाकी सुस्थितीत आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीसाठी वापरल्या जाणार्‍या दुचाकी दिवस-रात्र दामटल्या जातात. गस्तीवरील पोलिस सर्व्हिसिंग करण्यासाठी मोटार विभागात गाडी सोडण्यापेक्षा स्वतःच दुचाकीची दुरुस्ती करून घेतात. ज्यामुळे दुचाकीच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन जास्त प्रमाणात इंधन लागते.

वर्दीतील वाहनचालकांना मोबाईलचे वेड
वरिष्ठ अधिकार्‍यांना इच्छित स्थळी पोहोचवल्यानंतर वाहनचालक मोबाईलवर दंग राहतात. वाहनाच्या बाहेर बसल्यानंतर मोबाईलचा आवाज आजूबाजूला लोकांना ऐकू जातो. त्यामुळे वाहनचालक वाहनात बसणे पसंत करतात. उन्हामुळे गाडीत उकडत असल्याने एसी आणि पर्यायाने गाडीचे इंजिन सुरू ठेवले जाते.

वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
आयुक्तालय परिसरात पार्क केलेल्या पोलिसांच्या वाहनांचे इंजिन सुरू असल्याचे सर्रास पहावयास मिळते. येथे पोलिस निरीक्षकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांची ये-जा असते. मात्र, याकडे तेदेखील सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वरिष्ठदेखील ‘माझं कुठं जळतंय’ असाच विचार करीत नसतील ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

…असे चालते कामकाज
पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी काही खासगी पंप ठरवून देण्यात आले आहेत. इंधन भरण्यापूर्वी े मोटार विभागाकडून इंधन मिळण्यासाठीची पावती घे

Back to top button