

पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये 15 लाख 6 हजार 293 कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यापैकी 14 लाख 85 हजार 274 कोरोनामुक्त झाले. 20 हजार 608 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 1364, तर जिल्ह्यात 411 सक्रिय रुग्ण असून. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांच्या तुलनेत 30 टक्के रुग्ण फक्त पुणे जिल्ह्यात आहेत.
मार्च 2020 मध्ये महाराष्ट्रातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात आढळला होता. त्यानंतर कोरोना महामारीच्या प्रत्येक लाटेमध्ये पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले. जून 2022 नंतर कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या घटली. कोरोनाची 'पँडेमिक'कडून 'एंडेमिक'कडे वाटचाल सुरू झाल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत नसली तरी कोरोना आणि एच 3 एन 2 अशा दोन्ही विषाणूंचा संसर्ग एकाच वेळी वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.