गुड न्यूज: पुणे- मुंबई विमान सेवेला अखेर हिरवा कंदील, एअर इंडियाकडून तिकीट बुकिंगला सुरूवात | पुढारी

गुड न्यूज: पुणे- मुंबई विमान सेवेला अखेर हिरवा कंदील, एअर इंडियाकडून तिकीट बुकिंगला सुरूवात

पुणे, पुढारी वृत्तसेवा: तब्बल पाच वर्षानंतर पुणे ते मुंबई विमानसेवेला आता सुरुवात होणार आहे. एअर इंडिया मार्फत सध्या ही सेवा सुरू करण्यात येत असून 26 मार्चपासून पुणेकरांना पुणे मुंबई हा प्रवास करता येणार आहे. त्याचे बुकिंग सध्या सुरू झाले आहे.

पूर्वी जेट एअरलाइन्स मार्फत पुणे मुंबई विमानसेवा पुरवली जात होती. मात्र 2019 मध्ये ही सेवा बंद करण्यात आली होती. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईहून पुण्याला येण्यासाठी नागरिकांना बाय रोड किंवा रेल्वेने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांना पुणे मुंबई प्रवासासाठी तीन ते चार तास मोजावे लागत होते. मात्र आता ही सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांना पुणे मुंबई हा प्रवास फक्त एका तासात करता येणार आहे.

– शनिवार वगळता सहा दिवस विमान उड्डाणे…
– पुण्याहून उड्डानाची वेळ – सकाळी 11:20 वा.
– मुंबईत पोहोचण्याची वेळ – दुपारी 12:20 वाजता
– विमान उड्डाणाचा वेळ –  १ तास
– 114 नियमित इकॉनॉमी क्लास सीट
– 8 बिझनेस क्लास सीट्स

पुणे ते मुंबई तिकीट दर …. (स्रोत :- एअर इंडिया संकेतस्थळ)

– इकॉनोमी क्लाससाठी भाडे – 2237 रुपये

– सुपर व्हॅल्यू इकॉनॉमी – 3738 रुपये

– फ्लेक्सी सेव्हर इकॉनॉमी – 6573 रुपये

– फ्लेक्सिबल इकॉनॉमी – 11,823 रुपये

मुंबई ते पुणे तिकीटदर…

– इकॉनॉमीसाठी – १९२२ रुपये

– सुपर व्हॅल्यू इकॉनॉमीसाठी – ३,४२३ रुपये

– फ्लेक्सी सेव्हर इकॉनॉमी – ६२५८ रूपये

– फ्लेक्सी इकॉनॉमीसाठी – ११,५०८ रुपये

येत्या 26 तारखेपासून पुणे मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडिया एअरलाइन्स कडून याचे नियोजन करण्यात आले आहे. उड्डाणाकरिता आवश्यक असलेला स्लॉट एअर इंडियाने घेतला आहे.

– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

जेट एअरवेज बंद झाल्यानंतर या मार्गावर बिझनेस व इकॉनोमिक क्लास असलेली त्या तोडीची विमानसेवा असण्याची नितांत आवश्यकता होती. आपला स्लॉट राखून याची पूर्तता एअर इंडिया करीत आहे, याचे मोठे समाधान आहे. या विमानसेवेस प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यास संध्याकाळची पण सेवा भविष्यात सुरू करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यास एअर इंडियास प्रोत्साहन मिळू शकेल. प्रस्थानाच्या वेळेचे योग्य नियोजन, काटेकोर पणे वेळापत्रकाचे पालन व विमानतळावर प्रवाशांना उत्तम सेवा मिळाल्यास ही पुणे-मुंबई फ्लाईट प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरू शकेल.

– धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ञ

Back to top button