चितळकरवाडी-भावडी रस्त्यासाठी 12 कोटी | पुढारी

चितळकरवाडी-भावडी रस्त्यासाठी 12 कोटी

वरकुटे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : चितळकरवाडी (वरकुटे बुद्रुक) ते भावडीपाटी रस्त्याला 12 कोटी 39 लाख रुपये मंजूर झाले आहेत. परिणामी, येथील नागरिकांची गैरसोय थांबणार आहे. आ. दत्तात्रय भरणे यांचे चितळकरवाडी ग्रामस्थांनी रविवारी (दि. 19) भरणेवाडी येथे सत्कार करून आभार मानले . चितळकरवाडी ते भावडीपाटी रस्त्यामुळे आता अगोती नं. 1 , अगोती नं. 2, चितळकरवाडी येथील नागरिकांना लोणी देवकर, भावडी या गावांना जाण्यासाठी सोय होणार आहे.

हा दीड किलोमीटरचा रस्ता कच्चा असल्यामुळे स्थानिक प्रवाशांना अधिकचे आठ ते दहा किलोमीटरचे अंतर पार करून आठवडे बाजारासाठी जावे लागत होते. रस्ता खराब असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतातून शेतमाल बाहेर काढताना अडचणी येत होत्या. निधी मिळाल्यानंतर रस्ता लवकर पूर्ण झाल्यास या सर्व अडचणींवर मात होणार असल्याने परिसरातील शेतकरी तसेच स्थानिक प्रवाशांकडून आमदार भरणे यांचे आभार मानण्यात आले. या वेळी दत्तात्रय चितळकर, बाळासाहेब करे, संभाजी चितळकर, लक्ष्मण चितळकर, वैभव बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button