तिच्या प्रयत्नांमुळे तब्बल 32 वर्षांनी घडली चुकलेल्या माय-लेकरांची भेट !

तिच्या प्रयत्नांमुळे तब्बल 32 वर्षांनी घडली चुकलेल्या माय-लेकरांची भेट !

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : जवळपास बत्तीस वर्षांपासून सांगवीत चुकलेल्या एका पन्नाशीच्या वृद्ध महिलेला धडपड करून तिच्या कुटुबीयांच्या स्वाधीन करण्याचं काम त्या आय टी तज्ज्ञ महिलेने केले आहे. सांगवीत राहणार्‍या पूनम विनोद शंकरन या आपल्या ऑफिसला जायच्या रस्त्यावर सांगवीतील बसस्थानकाजवळ एक वृद्ध महिलेला बसलेले रोज पाहात असे. सलग तीन दिवस ती वृद्ध महिला एकाच ठिकाणी सकाळ, संध्याकाळ दिसल्याने पूनम विचारात पडल्या. त्यांनी तिची चौकशी करत खायला दिले. जवळपास पाच, सहा दिवस त्या वृद्ध महिलेला रोजच जेवण देत होत्या. त्या आजीकडून काही माहिती मिळते का? याचा शोध घेत होत्या. त्या आजी त्यांना नेवासा तालुक्यातील बेलपिंपळी गावी मला बसवून द्या! इतकेच म्हणायच्या. ना गाव,पत्ता, नाव मिळत नसल्याने पूनम शंकरन यांनी त्या वृद्ध महिलेस त्यांच्या कुटंबीयांच्या स्वाधीन करण्याचा निश्चयच केला.

गेल्या तीन दिवसांपूर्वी अवकाळी पावसात अडकलेल्या त्या वृध्द महिलेस पूनमने घरून जेवणाचा डबा आणि पांघरूण नेऊन दिले. दुसर्‍या दिवशी सांगवी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक ंविजय शेलार आणि पोलिस शिपाई किरण खडक उमरगे यांच्या पथकाच्या मदतीने नेवासा गावाची चौकशी केली. नेवासाचे पोलिस पाटील साठे यांच्याकडून बेल पिंपळमधून तब्बल गेल्या बत्तीस वर्षांपासून एक वृद्ध महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मिळणारी माहिती आणि वृद्ध महिलेची पडताळणी केली आणि पूनमच्या प्रयत्नांना यश मिळालं.

जनाबाई सुरसे नावाची वृद्ध महिला बेलपिंपळी गावातून गेल्या बत्तीस वर्षांपासून हरवल्याची माहिती उघड झाली. बेलपिंपळीतून जनाबाई यांच्या कुटुंबीयांचा शोध लागला. सांगवी पोलिसांनी जबाब नोंदवून एका बत्तीस वर्षांपासून चुकलेल्या आईला मुलांकडे सुपूर्द केले.

सांगवी पोलिसांच्या मदतीने जनाबाई सुरसे यांना आज त्यांच्या हक्काचं कुटुंब सापडून दिलं. बत्तीस वर्षांनी ताटातूट झालेल्या आई आणि मुलांची गळाभेट झाली. त्यावेळी उभयतांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एखादा गरजू अडचणीत असेल तर नक्कीच माणसाने माणुसकी दाखवून मदत करायला पाहिजे.
                                                                         -पूनम विनोद शंकरन, सांगवी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news