पुणे : ‘ला-निनो’वरून हवामानशास्त्रज्ञांत मतभेद

पुणे : ‘ला-निनो’वरून हवामानशास्त्रज्ञांत मतभेद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतात या वर्षाच्या मध्यावर अल निनोचा प्रभाव पडून मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अमेरिकेतील संस्थेने व्यक्त केली आहे. मात्र, त्यावर हवामान शास्त्रज्ञांतच मतभेद असून, भारतीय शास्त्रज्ञांनी हे मत खोडून काढले आहे.
अमेरिकी संस्था 'नॅशनल ओशियानिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन'ने अंदाज वर्तवला आहे की, अल निनोची परिस्थिती 2023 च्या मध्यात सुरू होईल. याचा थेट परिणाम भारतीय नैर्ऋत्य मान्सूनवर पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारताच्या शेतीसाठी अत्यंत धोकादायक ठरणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, भारतीय शास्त्रज्ञ म्हणतात, हा अंदाज आताच काढणे चुकीचे असून भारताच्या मान्सूनवर त्याचा परिणाम होणार नाही. मे महिन्यातच अल निनोच्या परिस्थितीवर भाष्य करणे सोपे जाईल, असे मत भारतीय शास्त्रज्ञांचे आहे.

अल निना व ला निनो कसा तयार होतो..
अमेरिकी संस्थेच्या दाव्यानुसार यापूर्वी अल निनो 2009, 2014, 2015 आणि 2018 या वर्षांमध्ये सक्रिय होते आणि त्याचा थेट परिणाम भारतातील नैर्ऋत्य मोसमी पावसावर झाला होता. ला नीना आणि एल निनो मिळून एक हवामान चक्र तयार करतात, ज्याचा जगभरातील हवामान आणि महासागर परिस्थितीवर प्रचंड प्रभाव पडतो. अल निनो दरम्यान, पूर्व आणि मध्य विषुवृत्तीय प्रशांत महासागरातील पाणी असामान्य तापमान वाढीने ग्रासले जाते. याउलट, ला निनाच्या पूर्व आणि मध्य विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील पाणी थंड होते. या दोन घटनांचा एकत्रितपणे सागरी प्रवाह, माशांची संख्या आणि वार्‍याच्या प्रवाहावर परिणाम होतो. त्यांच्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये जास्त पाऊस पडतो, तर काही भागांत दुष्काळ पडतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news