पिंपळे गुरव : संपामुळे रुग्णालयात तुरळक गर्दी | पुढारी

पिंपळे गुरव : संपामुळे रुग्णालयात तुरळक गर्दी

पिंपळे गुरव : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे नेहमी गर्दीने गजबजलेल्या औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाची बापाची, आपलं सरकार देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही, अशा घोषणा देत जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिकांचे गेल्या पाच दिवसांपासून कामबंद आंदोलनऔंध जिल्हा रुग्णालय आवारात सुरू आहे.

परिचारिकांकडून शंखनाद
या वेळी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी परिचारिकांकडून शंखनाद करण्यात आला. रुग्णालयातील परिचारिका, एक्स रे टेक्निशियन, फार्मसिस्ट यामध्ये सहभागी झाले आहेत.

अपघातग्रस्तांसाठी सेवा सुरू
इमर्जन्सी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरता कर्मचारीवर्ग नेमला आहे. शासनाने कर्मचार्‍यांच्या मागणीचा विचार करुन पेन्शन योजना लागू करण्याची मागणी परिचारिका प्रेरणा जगताप यांनी केली आहे.

Back to top button