पुणे : कांबळेश्वर येथे युवकाने मित्रांच्या मदतीने केली दगडफेक | पुढारी

पुणे : कांबळेश्वर येथे युवकाने मित्रांच्या मदतीने केली दगडफेक

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे शनिवारी ( दि.१८ ) रात्री मारामारी, दगडफेक झाल्याची घटना घडली.अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे सुत्रांकडून समजते. मागील पंधरा दिवसांपूर्वी कांबळेश्वर गावातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला असल्याचे समोर येत आहे.

या प्रकरणात गावातील एका युवकावरच संशय घेतल्याने त्या युवकाने मित्रांच्या मदतीने मुलीच्या वडिलांची चार चाकी गाडी फोडून एकाला दांडक्याने जबर मारहाण केली. या घटनेचा गोंधळ झाल्यानंतर गावातील आजुबाजुचे लोक जमा झाल्याने संबंधित युवकाला व त्याच्या साथीदारांना ग्रामस्थांनी पकडण्याचा प्रयत्न केला ते पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र संबंधित मित्रांच्या दुचाकी ग्रामस्थांनी फोडून टाकल्या. यामध्ये एक युवक ग्रामस्थांनी पकडला असल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेची फिर्याद घेण्याचे काम सुरू असल्याचे माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले.

Back to top button