पिंपरी : व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी | पुढारी

पिंपरी : व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी

पिंपरी : व्यावसायिकाला आणि त्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत 78 हजार रुपये खंडणी घेतली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना जानेवारी 2022 ते 12 मार्च 2023 या कालावधीत ओम लँड डेव्हलपर्स तळवडे येथे घडली. सुधीर सोपान जाधव असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संदीप ऊर्फ संजय आनंदा काळोखे (40, रा. तळवडे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. दरम्यान, सुधीर जाधव याने फिर्यादी यांना धमकी दिली.

तू प्लॉटिंग व्यवसायात भरपूर पैसा कमावला आहे. तुला व्यवसाय करायचा असेल तर दरमहा दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. पैसे दिले नाहीत तर जीवे मारीन, अशी सुधीर याने फिर्यादीस धमकी दिली. फिर्यादींकडून 38 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. त्यानंतर पुन्हा 50 हजारांची मागणी करून 40 हजार रुपये काढून घेतले. पुन्हा दोन लाखांची मागणी केली. पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

 

Back to top button