

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद- शिर्डी बसमध्ये बसणार्या प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा उठवित मोबाईल चोरणारा चोरटा पोलिसांनी जेरबंद केला. वेरोनिका राजु चक्रनारायण (वय 43 वर्षे, नोकरी नर्स, रा. श्रीसाई म्हाडा हौसींग सोसायटी, श्रीरामपूर) या साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल शिर्डी येथे नाईट डयुटीवर असतात. सायंकाळी 6ः45 वाजता श्रीरामपूर आगारात बसची वाट पाहत होत्या. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास औरंगाबाद- शिर्डी बसमध्ये बसण्यास प्रवाशांची गर्दी झाली होती.
वेरोनिका चक्रनारायण बसमधून शिर्डी येथे पोहचल्यानंतर त्यांना पर्सची चैन उघडी दिसली. पर्समध्ये ठेवलेला अडिच हजार रुपयांचा मोबाईल दिसला नाही. मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिली. गुन्ह्याचा तपास शहर पोलिस करताना, पो. नि. हर्षवर्धन गवळी यांना बातमीदाराने माहिती दिली की, मोबाईल शफिक रफिक कुरेशी (वय 25 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला, वार्ड नं. 2, श्रीरामपूर) याने चोरला आहे. तपास पथकाने शोध घेवुन शफिक कुरेशी यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेला मोबाईल दिला. पो. ना. बी. एच. पंडित तपास करीत आहे.