पुणे : हवेली बाजार समिती निवडणूक ‘मविआ’ एकत्रित लढणार | पुढारी

पुणे : हवेली बाजार समिती निवडणूक ‘मविआ’ एकत्रित लढणार

मांजरी : पुढारी वृत्तसेवा : ‘हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (मविआ) एकत्रित लढणार आहे. त्यासाठी विविध ठिकाणी बैठका, मेळावे घेऊन इच्छुक उमेदवार व ज्येष्ठांची मते जाणून घेतली जात आहेत. त्यातून तरुण, निष्कलंक, निष्ठावंत आणि सर्वसमावेशक उमेदवारांना संधी दिली जाणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली. तब्बल वीस वर्षांनंतर हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे.

या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुक्यात ठिकठिकाणी मेळावे व बैठकांचे आयोजन केले जात आहे. हडपसर येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शनिवारी बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. आमदार अशोक पवार, चेतन तुपे, संजय जगताप, सुरेश घुले, प्रकाश म्हस्के, माणिक गोते, सचिन दोडके, बाबूराव चांदेरे, सुनील चांदेरे, दिलीप बराटे, बाळासाहेब पारगे, दिलीप वाल्हेकर, र्त्यंबक मोकाशी, भरत झांबरे, राजेंद्र खांदवे, भारती शेवाळे, महादेव काळभोर, माधव कांचन आदी या वेळी उपस्थित होते.

Back to top button