मंचर : देशमुखांचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा

मंचर : देशमुखांचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील बेलसरवाडी येथे आयोजित बैलगाडा शर्यतीत निरगुडसर येथील राहुल झुंजार हांडे देशमुख यांच्या गाड्याने 'घाटाचा राजा' हा किताब पटकविला. दोन दिवसांत यात्रेत 400 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांकात धनुभाऊ सुधाकर हिंगे अवसरी व नंदाराम विष्णू भालेराव कळंब यांचे बैलगाडे फळीफोड ठरले. पहिल्या दिवसाच्या शर्यतीचे उद्घाटन बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे, माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. प्रथम क्रमांकात 12 सेकंदांत धनुभाऊ सुधाकर हिंगे अवसरी यांचा बैलगाडा फळीफोड ठरला. द्वितीय क्रमांक भिवसेन नानाभाऊ मोढवे साकोरे, तृतीय क्रमांक तुकाराम लक्ष्मण पोंदे लाखनगाव व चतुर्थ क्रमांक टँकर अँड गावडे जुगलबंदी अवसरी खुर्द यांनी पटकावला.

सायंकाळी प्रथम क्रमांकातील विजेत्या बैलगाड्यांची अंतिम शर्यत घेण्यात आली. त्यामध्ये राहुल झुंजारराव हांडे देशमुख, शिवराज्य प्रतिष्ठान टावरेवाडी, जयसिंग यशवंत घेवडे कारेगाव,आबाजी होणाजी हिले अवसरी, पांडुरंग आनंदा सोनवणे शिंगवे यांचे बैलगाडे विजेते ठरले. पहिल्या दिवशी दिनेश एकनाथ बांगर व जयसिंग यशवंत घेवडे यांच्या बैलगाड्यांनी 'घाटाचा राजा' किताब पटकविला.
दुसर्‍या दिवशी उद्योजक गोविंदशेठ खिलारी यांच्या हस्ते शर्यतीच्या घाटाचे उद्घाटन झाले. प्रथम क्रमांकात 12 सेकंदांत नंदाराम विष्णू भालेराव कळंब यांचा बैलगाडा फळीफोड ठरला.

द्वितीय क्रमांक म्हातारबा रखमाजी वाळुंज घोडेगाव, तृतीय क्रमांक प्रथमेश किसन चासकर चास यांनी पटकावला. 'घाटाचा राजा' हा किताब दत्तात्रेय बबनराव आवटे महाळुंगे पडवळ यांच्या बैलगाड्याने मिळविला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी शर्यतीला भेट देत शुभेच्छा दिल्या. शर्यतीत निशाणाची जबाबदारी नामदेव पोखरकर यांनी पार पाडली. रामशेठ गावडे, पांडूशेठ टाव्हरे, यशवंत गावडे, बाळासाहेब टाव्हरे, दशरथ पोखरकर, संतोष हिंगे यांच्यासह ग्रामस्थांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. नाद बैलगाडा ग्रुपने नियोजन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news