

पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा येथे भरधाव कार रस्ता दुभाजकात घुसली. रस्ता दुभाजकाचा पत्रा कारमध्ये घुसल्याने अपघात झाला. या अपघातात गाडीतील तीन प्रवाशांपैकी एकजण गंभीर जखमी झाला असून, जखमीस रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघात शनिवारी (दि. 18) सायंकाळी मावळातील सोमाटणे फाटा येथे झाला.
रात्री उशिरापर्यंत जखमींची नावे समजू शकली नाहीत. शनिवारी सायंकाळी मुंबईवरून पुण्याकडे येणारी कार सोमाटणे फाटा येथून पुणे मार्गाकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट रस्ता दुभाजकात घुसली. रस्ता दुभाजनासाठी लावलेला पत्रा कारमध्ये घुसून कारचे मोठे नुकसान झाले आहे.