पुणे : वीजबिलांपोटी 146 कोटींची थकबाकी | पुढारी

पुणे : वीजबिलांपोटी 146 कोटींची थकबाकी

पुणे : पुणे परिमंडलातील 6 लाख 36 हजार 541 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे 146 कोटी 14 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये 5 लाख 49 हजार 397 घरगुती ग्राहकांकडे 93 कोटी 50 लाख रुपये, 75 हजार 47 वाणिज्यिक ग्राहकांकडे 33 कोटी 68 लाख रुपये तसेच 12 हजार 97 औद्योगिक ग्राहकांकडे 18 कोटी 96 लाखांची थकबाकी आहे.

50 कोटींची थकबाकी
पुणे शहरात 2 लाख 42 हजार 937 घरगुती ग्राहकांकडे 34 कोटी 82 लाख रुपये, 37 हजार 879 वाणिज्यिक ग्राहकांकडे 13 कोटी 34 लाख रुपये, 3 हजार 224 औद्योगिक ग्राहकांकडे 1 कोटी 84 लाख रुपयांची थकबाकी आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पुणे शहरातील एकूण 2 लाख 84 हजार 40 वीजग्राहकांकडे 50 कोटी 3 लाख रुपयांची थकबाकी.

ग्रामीण भागातही ग्राहकांची पाठ
ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली या तालुक्यांमध्ये 1 लाख 96 हजार 424 घरगुती ग्राहकांकडे 40 कोटी 16 लाख रुपये, 20 हजार 233 वाणिज्यिक ग्राहकांकडे 12 कोटी 25 लाख रुपये, 4 हजार 77 औद्योगिक ग्राहकांकडे 8 कोटी 52 लाख रुपयांची थकबाकी आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 35 कोटी थकले
पिंपरी चिंचवड शहरात 1 लाख 1 हजार 35 घरगुती ग्राहकांकडे 18 कोटी 50 लाख रुपये, 16 हजार 935 वाणिज्यिक ग्राहकांकडे 8 कोटी 7 लाख रुपये, 4 हजार 796 औद्योगिक ग्राहकांकडे 8 कोटी 58 लाख रुपयांची थकबाकी आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 1 लाख 31 हजार 766 वीजग्राहकांकडे 35 कोटी 17 लाख रुपयांची थकबाकी आहे.

Back to top button