पुणे : सराईत गुंडाकडून वकिलाला मारहाण | पुढारी

पुणे : सराईत गुंडाकडून वकिलाला मारहाण

पुणे : मोटारसायकलवरून जात असलेल्या वकिलाला जबरदस्तीने थांबवून त्याला मारहाण करत त्याच्याकडील 42 हजारांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. 17 मार्च रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास गोखलेनगर परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भागात ही घटना घडली. याप्रकरणी, मोन्या नाकटे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जनवाडी येथे राहणार्‍या 36 वर्षीय वकिलाने फिर्याद दिली आहे.

घटनेच्या दिवशी फिर्यादी मोटारसा यकलवरून जात असताना आरोपीने त्यांना जबरदस्तीने थांबवून हाताने मारहाण केली. त्यानंतर, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, चांदीचे ब—ेसलेट व रोख असा 42 हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन गेला. याखेरीज, फिर्यादीचा भाऊ व घराच्या बांधकामाच्या साइटवरील कामगारांना मारहाण करून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष कोळी करीत आहेत

Back to top button