पिंपरी : टेलिग्रामवरून महिलेची दोन लाख 85 हजारांची फसवणूक

पिंपरी : टेलिग्रामवरील फसव्या पेजच्या माध्यमातून एका महिलेची दोन लाख 85 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार कासारवाडी येथे उघडकीस आला. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेलिग्रामवरील अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादी यांना टेलिग्रामवरील फसव्या पेजच्या माध्यमातून संपर्क केला. पैसे कमवून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख 85 हजार रुपये घेऊन त्यांना कोणताही परतावा न देता तसेच, गुंतवलेली रक्कम परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.