तळजाई पठार-पुणे स्टेशन मार्गावर पीएमपी बस सुरू

धनकवडी : पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाने पुणे स्टेशन ते तळजाई पठार मार्गावर बससेवा नुकतीच सुरू केली आहे. तळजाई पठार, तीन हत्ती चौक, संभाजीनगर, पद्मावती बस स्टॉप, लक्ष्मीनगर कॉर्नर, पर्वती दर्शन, स्वारगेटमार्गे पुणे स्टेशन असा बसचा मार्ग आहे. याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुशांत ढमढेरे यांनी या बससेवेसाठी पाठपुरावा केला होता. प्रभाग क्रमांक 35 मधून पुणे स्टेशनकडे जाण्यासाठी थेट बस नसल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत होती.
या मार्गावर बससेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन तुळजाई पठार परिसरातील नागरिकांनी पीएमपी प्रशासनाला दिले होते. याबाबत ढमढेरे यांनी पीएमपीच्या अधिकार्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे तळजाई पठार ते पुणे स्टेशन या मार्गावर बस (क्र.31/1) सुरू झाली आहे. या बसमुळे तळजाई पठार परिसरातील नागरिकांना पुणे शहर व पुणे स्टेशन परिसरात जाणे-येणे सोयीचे झाले आहे. या बससेवेचे नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. फ