पुणे : महापालिकेच्या ‘इन्सिनेरेटर’ला प्रतिसाद | पुढारी

पुणे : महापालिकेच्या ‘इन्सिनेरेटर’ला प्रतिसाद

पुणे : शहरातील लहान-मोठ्या मृत प्राण्यांची व जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या इन्सिनेरेटर प्रकल्पाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी मृत प्राणी किंवा जनावरांना इकडे-तिकडे न फेकता इन्सिनेरेटरमध्ये त्याची विल्हेवाट लावावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

इन्सिनेरेटर प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रकल्पामुळे पाळीव आणि भटक्या मृत प्राण्यांची व जनावरांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. यामध्ये त्यामुळे नागरिकांनी मृत प्राणी किंवा जनावरे आडबाजूला फेकून न देता, त्यांचे दहन इन्सिनेरेटर प्रकल्पात करावे.
                                 – डॉ. सारिका फुंडे, पशु वैद्यकीय अधिकारी, महापालिका

भटके मृत प्राणी व जनावरे

लहान प्राण्यांची संख्या  जनावरांची संख्या
2018 (जून ते डिसेंबर)  1,525 2018 (डिसेंबर) 10
2019 6,324  2019 1,065
2020 5,226  2020 554
2021 5,170  2021 963
2022 (जाने. ते मे)  2,353 2022 (जाने. ते मे) 336
एकूण 20,598  एकूण 2,928

 

Back to top button