वाकड : डीपी रोडवरील दुभाजक हटविले; वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा | पुढारी

वाकड : डीपी रोडवरील दुभाजक हटविले; वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा

वाकड; पुढारी वृत्तसेवा : वाकड येथील चिंधाजी भूमकर चौक ते डीपी रोडवरील दुभाजक महापालिकेकडून काढण्याचे काम सुरू झाले. वाकड येथील चिंधाजी भूमकर चौक ते डीपी रोड हा 18 मीटर रुंदीचा रॉयल एंट्राडा सोसायटीसमोरील रस्ता 24 मीटर रुंदीच्या मुख्य डीपी रोडला जोडला गेला असून, या रस्त्यांच्या वाहतुकीस अडथळा ठरणारे दुभाजक काढण्यात आले असून, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे.

या रस्त्यावरून ऑफिसला जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यामुळे कस्तुरी चौक हिंजवडीकडे जाणार्‍या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. दुभाजक काढले गेल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हा दुभाजक रस्त्याच्या मधोमध होता. रस्ता मोठा होत असल्यामुळे तो काढण्यासाठी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. महापालिकेने उशिरा का होईना तो काढण्यासाठी सुरुवात केली.

                                        – विशाल वाकडकर, सामाजिक कार्यकर्ते

Back to top button