तळेगाव दाभाडे : विविध स्पर्धा परीक्षेत आत्मविश्वास वाढवावा | पुढारी

तळेगाव दाभाडे : विविध स्पर्धा परीक्षेत आत्मविश्वास वाढवावा

तळेगाव दाभाडे; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन आपला आत्मविश्वास वाढवावा, असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी व्यक्त केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व कै. अ‍ॅड शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात सौ. शिंदे बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्षपद गणेश खांडगे होते. या वेळी सचिव संतोष खांडगे, संचालक दामोदर शिंदे, महेश शहा, सोनबा गोपाळे, शंकरराव नारखेडे, जयंत मदने, मुख्याध्यापक कैलास पारधी, संजय वंजारे, पांडुरंग पोटे, सुदाम वांळुज, भाऊसाहेब आगळमे, कदमबांडे तसेच शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

या वेळी संतोष खांडगे म्हणाले, शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षाची (च.झ.डउ णझडउ) ओळख व्हावी, म्हणून संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळातील इयत्ता 9 वीतील विद्यार्थ्यांकरिता समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी उच्च शैक्षणिक गुणवत्ताप्राप्त केल्यास स्वत:च्या पायावर सहज उभे राहता येते, असे शिंदे म्हणाल्या.

तर उच्च पदाची नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे महत्वाचे आहे, असे मदने म्हणाले. तसेच भविष्यात देशाला लागणारे प्रशासक या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास संस्था उपाध्यक्ष गणेश खांडगे यांनी व्यक्त केला. या वेळी गुणवत्ता यादीत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिव संतोष खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रभा काळे, रेवाप्पा शितोळे यांनी केले. अभार सोनबा गोपाळे यांनी मानले.

Back to top button