पिंपरी : आर्थिक व्यवहारातून व्यावसायिकाला मारहाण | पुढारी

पिंपरी : आर्थिक व्यवहारातून व्यावसायिकाला मारहाण

पिंपरी : पैशांच्या व्यवहारातून व्यावसायिकाला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच, त्याच्याकडून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर हातातील हिरेजडीत चार अंगठ्या, क्रेडिट कार्ड काढून घेतले. इंद्रायणीनगर, भोसरी व हिंजवडी येथे 24 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन ते रात्री साडेदहा या वेळेत हा प्रकार घडला. याप्रकरणी विकास महादू दरवडे (45, रा. उढाणे स्थळ, दोंदे, ता. खेड, जि. पुणे) यांनी बुधवारी (दि. 15) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजेंद्र बाबूराव निकम (38, रा. हुलावळेवस्ती, हिंजवडी) आणि त्याचे दोन साथीदारांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी पैशाच्या व्यवहारावरून फिर्यादीच्या ऑफिसमध्ये आले. फिर्यादी यांना शिवीगाळ, मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्या चारचाकी वाहनामधून हिंजवडी येथे घेऊन गेले. तेथे शिवीगाळ व मारहाण केली. तसेच, पाच हजार रुपये रोख आणि 34 हजार 600 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या हातातील हिरेजडीत चांदीच्या चार अंगठ्या, बँकेचे क्रेडिट कार्ड काढून घेतले.

Back to top button