पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कारची ट्रकला मागून धडक, 3 जणांचा जागीच मृत्यू | पुढारी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कारची ट्रकला मागून धडक, 3 जणांचा जागीच मृत्यू

पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात तीनजणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना महामार्गावरील उर्से गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे. या कारमध्ये बसलेल्या तीनजणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसानी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर कि.मी ८२.७०० येथे मालवाहू ट्रकचा टायर फुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा असताना मुंबईवरून पुण्याला अतिवेगात जाणारी टाटाची कार थेट ट्रकच्या मागील बाजूने घुसली यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. यातील एका मृतदेहाची ओळख पटली असून अजून दोन जणांची ओळख पटविण्याचे काम शिरगावं परंदवडी पोलीस करीत आहे.

Back to top button