संजय राऊत यांच्या निषेधार्थ दौंडला मोर्चा, सभा | पुढारी

संजय राऊत यांच्या निषेधार्थ दौंडला मोर्चा, सभा

दौंड; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर पाचशे कोटींच्या भ्रष्टाचाराचे जे आरोप केले आहेत, त्याच्या निषेधार्थ दौंड शहरात १६ मार्च रोजी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या नेतृत्वाखाली कुल समर्थकांनी निषेध मोर्चा काढून सभा घेतली. या मोर्चाला शेतकऱ्यांनी आणि भीमा पाटसच्या सभासदांनी मोठा प्रतिसाद दिला.

निषेध सभेत बोलताना प्रेमसुख कटारिया म्हणाले, राहुल कुल यांना ‘टार्गेट’ करण्यासाठी संजय राऊत वायफळ बडबड करत आहेत. राऊत स्वतः भ्रष्टाचारी असून पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जेल बघून आले आहेत, त्यांनी काय भ्रष्टाचारावर बोलावे. राऊत यांना दौंड तालुका माहिती तरी आहे का केवळ तालुक्यातील काहीजण आपल्याला स्वतःला काहीच करता येत नसल्याने राऊत यांचे पाय धरायला जात आहेत. त्यांनी कधी कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावली का ते हजर का राहत नाहीत. कुल अध्यक्ष होण्यापूर्वी या भीमा पाटस कारखान्यावर 112 कोटींचे कर्ज कोणाच्या काळात होते हे त्यांनी पहावे त्यांना हा कारखाना बंद पाडण्याचा विडा उचलला आहे. परंतु राहुल कुल यांनी तो उधळून लावला.

नंदू पवार म्हणाले की, संजय राऊत हा देशाला लागलेला कलंक आहे शरद पवार यांचे नाव न घेता नंदू पवार म्हणाले की दौंड तालुक्यावर अन्याय कोणी केला आहे सर्वांना माहित आहे. या भीमा पाटस कारखान्याची मालमत्ता देखील 500 कोटींची नाही तर आरोप करताना संजय राऊत यांनी वायफळ बडबड करू नये. तानाजी दिवेकर म्हणाले की, संजय राऊत हे कोणाचे दलाली करत आहेत हे सर्वांना चांगले ठाऊक आहेत रमेश थोरात हे अलीबाबा चाळीस चोरच्या टोळीचे म्होरके आहेत

दिनेश गडदे म्हणाले की, चौकशी करायचीच असेल तर राहुल कुल सत्तेवर येण्यापूर्वी ज्यांनी भीमा पाटसचा कारभार पाहिला त्यांची व्हावी भीमा पाटस चालू झाल्याचा धसका काही जणांनी घेतला आहे. त्यांना भीमा पाटस हा दौंड शुगर प्रमाणेच खासगी करायचा घाट होता.
काही वर्षांपूर्वी माजी आमदार रमेश थोरात म्हणाले होते की ब्रह्मदेव आला तरी भीमापाटस चालू होणार नाही, त्यामुळे राहुल कुल यांचाच धसका विरोधकांनी घेतला आहे.

राहुल कुल त्यांना नडले आहेत म्हणूनच ते बिन बुडाचे आरोप करत आहेत. कुल यांनी कारखाना खासगी होऊ दिला नाही भीमा पाटससाठी त्यांनी आपले मालमत्ता गहाण ठेवली आहे. हरिभाऊ ठोंबरे म्हणाले की असे कितीही खोटे आरोप झाले तरी राहुल कुल यांना काहीही फरक पडणार नाही भारतीय जनता पार्टीचे दौंड तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे म्हणाले संजय राऊत चालू झालेला कारखाना कसा बंद पडेल हे पाहतात. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यशवंत खताळ म्हणाले की हा कारखाना तीन वर्षे बंद होता तेव्हा एकानेही याकडे लक्ष का दिले नाही.

Back to top button