सोमेश्वरनगर : कोपीवरची शाळा चालविणारा ‘सोमेश्वर’ राज्यात पहिलाच कारखाना

File photo
File photo
Published on: 
Updated on: 

सोमेश्वरनगर ; पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा हा प्रकल्प राबविला जात आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून अभ्यासवर्ग चालविणारा 'सोमेश्वर' हा राज्यातील पहिला कारखाना आहे. याशिवाय कारखाना परिसरातील ऊसतोड मजुरांना आरोग्य विभागाच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करीत असल्याचे प्रतिपादन 'सोमेश्वर'चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले.

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ व सोमेश्वर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड मजुरांसाठी सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी जगताप बोलत होते. शिबिरात
सुमारे 300 रुग्णांची तपासणी करीत उपचार करण्यात आले. या प्रसंगी उपाध्यक्षा प्रणिता होळकर, संचालक शैलेश रासकर, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे, रणजित मोरे, तुषार माहुरकर, वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड उपस्थित होते.

मजुरांच्या लहान मुलांना अंगणवाडीमार्फत आहार मिळवून देणे, नजीकच्या शाळेत दाखल करणे, स्तनदा व गर्भवती मातांना आरोग्य विभागाच्या योजना मिळवून देणे, ही कामे केली जातात. या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी ऊसतोडणी मजुरांमध्ये त्वचेचे आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाण जास्त आढळते. महिलांनी आहाराकडे लक्ष देऊन हिमोग्लोबीनचे प्रमाण चांगले राखल्यास उलट जास्त काम करू शकतील, असे आवाहन करीत आरोग्याचे सल्ले दिले.

दरम्यान, शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, नेत्र, त्वचा, बालरोग, स्त्रीरोग मेडिसीन अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी सुमारे 300 रुग्णांची तपासणी करून मोफत उपचारही केले.साई सेवा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाकडून मोफत ईसीजीची सोय करण्यात आली होती.
डॉ. विद्यानंद भिलारे, डॉ. तात्यासाहेब कोकरे,डॉ. राहुल शिंगटे, डॉ. विद्या नाझीरकर, डॉ. आर. डी. मदने, डॉ. श्रीमंत पाटील, डॉ. कर्णवीर शिंदे यांनी तपासणीचे काम केले. 'कोपीवरची शाळा' प्रकल्पाचे समन्वयक संतोष शेंडकर, परवेझ मुलाणी, शिवाजी चव्हाण, योगिता माळी, कुसुम शिंदे आदींनी शिबिराचे आयोजन केले. नौशाद बागवान यांनी सूत्रसंचालन केले. अमोल कर्चे यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news