

पिंपरी : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 29 एप्रिल 2012 ते एप्रिल 2022 या कालावधीत माण, चेन्नई आणि अमेरिका येथे घडला. याप्रकरणी पीडित विवाहितेने 14 मार्च 2023 रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती थंगराजा, सासू, सासरे रामाकृष्णन, दीर रविचंद्रन व राजा रामकृष्णन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा पती थंगराजा याने पीडितेला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच, छळ करण्यासाठीच तुझ्याशी लग्न केले आहे, असे म्हणत धमकावले. सासरच्या रीती, भाषा येत नाही, असे म्हणत सतत टोमणे मारून अपमानीत केले. त्यानंतर घरातून बाहेर काढून फिर्यादी यांचा छळ केला. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.