पिंपरी : फळ विक्रेत्याकडून खंडणी; तिघांना अटक | पुढारी

पिंपरी : फळ विक्रेत्याकडून खंडणी; तिघांना अटक

पिंपरी : फळ विक्रेत्याला धमकावून मागील एक वर्षापासून खंडणी घेणार्‍या तिघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. चिखली येथे मंगळवारी (दि. 14) ही कारवाई करण्यात आली. बाळू ऊर्फ जयंत नारायण गारुळे (वय 46), संदीप बाबूराव बाबर (वय 28), भारत नवनाथ सोनावणे (22, सर्व रा. चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपसात संगनमत करून साने चौक, चिखली येथे फळविक्री करणार्‍या व्यावसायिकाकडून दररोज 50 रुपयांचा हप्ता घेत होते. दरम्यान, एकदा हप्ता न दिल्याने आरोपींनी फळ विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच, त्याच्याकडून जबरदस्तीने 200 रुपये घेतले. याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार, पथकाने तिघांना चिखलीतून अटक केली. आरोपी बाळूच्या विरोधात खून, खुनासह दरोडा, जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, चोरी असे नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलिस निरिक्षक उद्धव खाडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलिस अंमलदार रमेश गायकवाड, सुनील कानगुडे, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, आशिष बोटके, गणेश गिरिगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button