पिंपरी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण | पुढारी

पिंपरी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड शहरात बुधवारी (दि.15) दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी हलक्या पावसाचे थेंब पडले. बुधवार सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे बाहेर फिरणार्‍यांना उन्हापासून दिलासा मिळाला. मात्र, हवामानात दमटपणामुळे उकाडा वाढला होता. शहरामध्ये गेले दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री उकाड्यामुळे घरातील व ऑफिसमधील वातानुकुलित यंत्रणा वेगाने फिरू लागली आहे. हवामानशास्त्र विभागाकडून येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रात्री गारांचा पाऊस
पिंपरी चिंचवड शहरात बुधवार रात्री साडेआठच्या सुमारास गारांचा पाऊस पडला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेमध्ये दमटपणा वाढला होता. रात्री अचानक आलेल्या पावसाने बाहेर पडणार्‍यांची चांगलीच फजिती झाली. दुचाकीस्वार व नागरिकांनी पावसापासून वाचण्यासाठी आडोसा शोधला. पावसामुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

Back to top button