पुणे : निमगाव केतकीत जुगारअड्ड्यावर छापा | पुढारी

पुणे : निमगाव केतकीत जुगारअड्ड्यावर छापा

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर इंदापूर पोलिसांनी छापा मारून एकूण 63 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 14) करण्यात आली. कालिदास दत्तात्रय माने (वय 54, रा. शेळगाव, ता. इंदापूर), पांडुरंग गेणबा बरळ (वय 65, रा. व्याहळी, ता. इंदापूर), गणपत भानुदास कुंभार (वय 59, रा. कुंभारवस्ती, पिटकेश्वर, ता. इंदापूर), रामदास अर्जुन भोंग (वय 50, रा. गोतोंडी, ता. इंदापूर), विलास भानुदास ढावरे (वय 63, रा. वरकटे खुर्द, ता. इंदापूर), हनुमंत प्रल्हाद बारवकर (वय 51), मोहन रामचंद्र राऊत (वय 45), नारायण गोपाळ बनकर (वय 43), रणजित लक्ष्मण भोंग (वय 38), रामदास विठ्ठल भोंग (वय 48) आणि शंकर भीमराव भोंग (सर्वजण रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिस हवालदार वैभव भगवान साळवे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव केतकी हद्दीतील जालिंदर गेणा बारवकर यांच्या पत्राशेडच्या आडोशाला डोंगरे कॉम्प्लेक्ससमोर आरोपी जुगार खेळत होते. याबाबतची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत 21 हजार 180 रुपये रोख व इतर साहित्य असा मिळून एकूण 63 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. इंदापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Back to top button