पुणे : संपामुळे दाखले मिळण्यास विलंब ! महा-ई सेवा केंद्रात विद्यार्थ्यांकडून केवळ अर्ज स्वीकारणे सुरू | पुढारी

पुणे : संपामुळे दाखले मिळण्यास विलंब ! महा-ई सेवा केंद्रात विद्यार्थ्यांकडून केवळ अर्ज स्वीकारणे सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने सर्वच विभागांतील कामकाजावर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता आहे. मात्र, तेही काम ठप्प झाले आहे. महा-ई-सेवा केंद्रात केवळ दाखल्यांसाठीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. ते वेळेत मिळतील का नाही, हे सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले. पुणे शहरात सुमारे 250, तर ग्रामीण भागात एक हजार 435 महा-ई-सेवा केंद्र कार्यरत आहेत. प्रत्येक तालुक्यात एक असे 14 सेतू केंद्र कार्यरत आहेत. सध्या आरटीई प्रवेशासाठी उत्पन्न आणि रहिवास दाखला आवश्यक आहे. अनेकांनी हे दाखले मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. दाखल झालेल्या अर्जांतील कागदपत्रांची पडताळणीसाठी अधिकारी नसल्याने दाखले मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

अधिकारी आल्यावर इतर प्रक्रिया…
पुणे स्टेशन परिसरात हवेली तालुक्याचे सेतू सुविधा केंद्र असून, या ठिकाणी कंत्राटी तत्त्वावर असलेले कर्मचारी आलेले अर्ज स्वीकारत होते. तर ज्यांचे दाखले तयार झाले आहेत त्यांना ते वितरित करत आहेत. दाखले कधी मिळणार, असे विचारले असता, कर्मचारी म्हणाले, आम्ही आता केवळ अर्ज स्वीकारत आहोत. अधिकारी कामावर आल्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण करतील.

हे दाखले रखडले
जातपडताळणी दाखले
रहिवास प्रमाणपत्र
उत्पन्न दाखले
नागरिकत्व प्रमाणपत्र
अन्य शासकीय दाखले

Back to top button