पुणे : शिष्यवृत्तीचे 1867 कोटी अडकले !महाविद्यालये ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा | पुढारी

पुणे : शिष्यवृत्तीचे 1867 कोटी अडकले !महाविद्यालये ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांना मिळालेली नाही. गेल्या दोन वर्षांची तब्बल 1867 कोटी 89 लाख 5 हजार 147 रुपये इतकी रक्कम शासनाकडून येणे आहे. ही रक्कम मिळण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती असोशिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट ऑफ रूरल एरिया संघटनेने दिली आहे.

संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले, शैक्षणिक वर्ष 2021-22, 2022-23 या वर्षांतील ईबीसी, एससी, व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी,एसटी प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर झाल्यानंतर संबंधित निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होतो; परंतु गेली दोन वर्षे हा निधी जमा झालेला नाही. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या काही अडचणींमुळे शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यापासून विद्यार्थी आणि महाविद्यालये वंचित राहिले आहेत. संबंधित निधी 3 दिवसांच्या आत विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करावा अन्यथा 15 टक्के प्रमाणे संबंधित विद्यार्थी आणि संस्था यांना व्याज देण्यात यावे; अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल.

Back to top button