बारामती: लाच प्रकरणी हवालदारावर गुन्हा | पुढारी

बारामती: लाच प्रकरणी हवालदारावर गुन्हा

बारामती, पुढारी वृत्तसेवा : दाखल गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करण्याच्या बदल्यात नऊ हजाराची लाच मागणी प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत हवालदार प्रदीप दत्तात्रय काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एका तक्रारदाराविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या हजेरीची नोंद घेण्यासाठी व तक्रारदाराच्या बाजूने मदत करण्यासाठी नऊ हजाराची मागणी काळे यांनी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्याची पडताळणी करत हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button