कोरेगाव भीमा : आरटीओच्याच वाहनाकडून नियमांची पायमल्ली | पुढारी

कोरेगाव भीमा : आरटीओच्याच वाहनाकडून नियमांची पायमल्ली

कोरेगाव भीमा; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नगर महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कारवाई करणार्‍या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहनाकडूनच नियमांचे उल्लंघन होत आहे. यावर कारवाई करणार
कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

मार्च महिना आला की पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणावर महामार्गावर वाहने अडवून वाहनांची कागदपत्रे तपासली जातात. कागदपत्रे नसल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु, काही ठरावीक वाहनांनाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काही वाहनचालकांकडून होत आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पुणे-नगर महामार्गावर वाघोली, लोणीकंद, सणसवाडी, कोरेगाव येथे मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. कारवाई सुरू असतानाच काही गाड्या क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करतानादिसतात. मात्र, त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्षकरीत असल्याचा आरोप वाहन चालक-मालक करीत आहेत.
पुणे-नगर महामार्गावर परिसरात हजारो डंपरमधून मोठ्या प्रमाणावर क्षमतेपेक्षा अधिक खडी-डबर यांची वाहतूक होत असते. परंतु, आरटीओचे अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात? हादेखील सवाल उपस्थित होत आहे.

सर्रास मोडतात नियम:
पुणे-नगर महामार्गावर कारवाईदरम्यानआरटीओची वाहने फिरत असतात. अशावेळी महामार्गावरील वाहतूक कोंडीत आरटीओचे अधिकारी अन्य वाहनांना थांबू देत नाहीत. मात्र, आपली वाहने मात्र थांबवितात. तसेच वाहने विरुद्ध दिशेने घेऊन येताना सर्रासपणे आढळून येतात. त्यामुळे अशापद्धतीने विरुद्ध दिशेने येणार्‍या आरटीओच्या वाहनांवर कारवाई कोण करणार? असा प्रश्न निर्माण
होत आहे.

Back to top button