बारामतीतील खांडजमध्ये गोबरगॅसमध्ये पडून पिता-पुत्रासह चौघांचा मृत्यू | पुढारी

बारामतीतील खांडजमध्ये गोबरगॅसमध्ये पडून पिता-पुत्रासह चौघांचा मृत्यू

बारामती; पुढारी वृत्तसेवा : गोबरगॅसच्या टाकीतील वायूमुळे चौघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील खांडज येथे घडली. या घटनेत एकजण अत्यवस्थ असून त्याला बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेत पिता-पुत्रासह चुलत्याचा व अन्य एकाला जीवाला मुकावे लागले.

या घटनेत प्रकाश सोपान आटोळे, प्रवीण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे व बापूराव लहूजी गव्हाणे यांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. १५) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास खांडज गावच्या हद्दीत २२ फाट्याजवळील आटोळेवस्ती येथे ही घटना घडली. गोबरगॅसच्या टाकीमध्ये पडल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनेनंतर तात्काळ त्यांना बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. दरम्यान या घटनेत आणखी एक जण अत्यवस्थ असून त्याला सिल्व्हर ज्युबिलीतून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

 

Back to top button