पिंपरी : अल्पवयीनवर लैंगिक अत्याचार; एकावर गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : अल्पवयीनवर लैंगिक अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यात मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 14 नोव्हेंबर 2022 ते 13 मार्च 2023 या कालावधीत खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडला.
आकाश गणेश वाकडे (24, रा. कुरुळी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 17 वर्षीय मुलीने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या खोलीमध्ये आकाश याचा मित्र भाडेकरू म्हणून राहतो. दरम्यान, आकाश याचे त्याच्या मित्राकडे येणे – जाणे असल्याने त्याची फिर्यादीशी ओळख झाली. या ओळखीतून आकाश याने फिर्यादीच्या आई- वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, फिर्यादी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button