वानवडी : तुम्हीच सांगा, चालायचे तरी कसे? पदपथांची दुरवस्था झाल्याने नागरिकांचा सवाल | पुढारी

वानवडी : तुम्हीच सांगा, चालायचे तरी कसे? पदपथांची दुरवस्था झाल्याने नागरिकांचा सवाल

वानवडी; पुढारी वृत्तसेवा : कोंढवा, वानवडी परिसरातील पदपथांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली असून, पादचार्‍यांना त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. या पदपथांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परिसरात अनेक ठिकाणी पदपथच नाहीत, तर आहे ते पदपथ बर्‍याच ठिकाणी उखडले आहेत. तसेच या पदपथांवर अतिक्रमणेही झाली आहेत.

काही ठिकाणी पदपथांवर वाहने उभी केली जातात. रस्त्यावरील वर्दळ दिवसेंदिवस वाढत असल्याने सध्याचे पदपथ नागरिकांसाठी अपुरे ठरू लागले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भावत असून, छोटे-मोठे अपघात होत आहेत. साळुंखे विहार रस्त्यावरील पदपथ सध्या उखडले आहेत.

रस्त्यावरील वाहने आणि पदपथांवरील अतिक्रमणांतून पादचार्‍यांना वाट काढावी लागत आहे. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत प्रशासनाचे परिसरातील पदपथांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने परिसरातील अतिक्रमणे हाटवून पदपथांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button